शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

By admin | Updated: April 27, 2017 00:04 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते.या आधी १५ उमेदवारांनी अलिबागच्या सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. दोन्ही यंत्रणांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ७ मे रोजी पार पडणार आहे. एकूण २१ सदस्य या महासंघात निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या नुकतीच पार पडली होती. गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक हे वेगवेगळ्या मतदार संघातील दिले होते. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे.महासंघाच्या उपविधी १:१ नुसार निवडणुकीकरिता संचालक मंडळाचे जे विभाग केलेले आहेत. ते विभाग म्हणजे मतदार संघ नाहीत, तसेच निवडून द्यावयाच्या सर्व जागांकरिता प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये सूचक, अनुमोदक वेगळ्या मतदार संघातील आहेत या कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आणि सदरचा निर्णय कायम ठेवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निणर्य चुकीचा आहे असा मुद्दा याचिकाकत्यांच्या वकिलांनी याचिकेत केला होता.अलिबागचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी दिलेला निर्णय योग्य तसेच सहकारी कायदा आणि निवडणूक नियमांना धरून आहे, असा युक्तिवाद सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य १४ जणांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सी.जी. गावणेकर यांनी काम पाहिले, तर सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ संपतराव पवार, मुग्धा पाटील यांनी काम पाहिले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून गिरीश तुळपुळे गटाचे महासंघावर असलेले वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)