शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बिनकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 97 हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:08 IST

देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत.

अलिबाग - कोरानाच्या विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात जमाबंदी पाठोपाठ आता संचार बंदीही लागू करण्यात आली आहे. या कालावधीत काही नागरिक बिनकामाचे घराबाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारावाईचा बडगा उगारला आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 396 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बिनाकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी उठा-बशा काढण्याची शिक्षाही देऊन टाकली आहे.देशात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. सुरुवातीला जनता कर्फ्यू, कलम 144 आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विविध दुकाने, अस्थापने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महत्वाच्या कामा व्यतीरिक्त नागरिकांनी बाहेर पडण्याला मज्जाव केलेला आहे. मात्र नागरिक भाजीमार्केट, मासळी मार्केट, किराणा मालाची दुकाने तसेत रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे अधोरेखित होते.त्यामुळे पोलिसांना आता कडक अंमलबजावणी करावी लागत आहे. 22 आणि 23 मार्च 2020 अशा सलग गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांनी अनुक्रमे 60 आणि  336 वाहन चालकांवर कारवाई केली आहे, तर अनुक्रमे 16 हजार 900 आणि 80 हजार 400 असा एकूण  97 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड