शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे नवीन पर्यावरण मसुद्याला हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:54 IST

अलिबाग : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए २०२० एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसीस) मसुद्यात लोकसहभागाचे हात छाटण्यात ...

अलिबाग : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए २०२० एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसीस) मसुद्यात लोकसहभागाचे हात छाटण्यात आले आहेत, तसेच विकासाच्या नावावर निसर्गाचा ºहास करण्याचे मार्ग खुले करण्यात आल्याने रायगड काँग्रेसने या मसुद्याला हरकत घेतली आहे.रायगड काँग्रेसच्या वतीने उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी सरकारकडे हरकत दाखल केली आहे. नवीन मुसद्यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत आणि तज्ज्ञांच्या मतास अधिक वजन दिले आहे. जर उल्लंघनासंदर्भात कुणी तक्रार केली, तरी प्रकल्पाचा सार्वजनिक अहवाल देणेही मंत्रालयावर बंधनकारक असेलच असे नाही. त्यामुळे सरकार उद्योगपतींना पाठीशी घालण्यासाठी हे बदल करीत असल्याचा आक्षेप शेतकरी आणि पर्यावरण विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस थांबविण्यासाठी हा मसुदा मागे घ्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे, अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली आहे.एकामागून एक मोठे औद्योगिक प्रकल्प रायगड जिल्ह्यात प्रस्तावित केले जात आहेत. यापूर्वी महामुंबई सेझ, विशेष आर्थिक प्राधिकरण, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर यासारखे प्रकल्प रायगड जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या कडव्या विरोधामुळे बहुतांश प्रकल्प मार्गी लागू शकलेले नाहीत. आधी महामुंबई सेझ, नंतर दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आता रायगड जिल्ह्यातील शेतकºयांपुढे एमएमआरडीएचे संकट आहे.मुंबई महानगर प्राधिकरणाने नुकताच नवीन विकास आराखडा तयार केला आहे. यात अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील हरितपट्ट्याचे औद्योगिक पट्ट्यात रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. अलिबागमधील शहाबाज येथे प्रस्तावित अदानी सिमेंट प्रकल्पाची जनसुनावणी कोरोनामुळे पुढे ढकलली होती. जर ही नियमावली संमत झाली, तर स्थानिक शेतकºयांचे म्हणणे ऐकून न घेता, कंपन्यांना शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस