शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रायगडमध्ये हाेम आयसाेलेशनमध्ये ९४१ कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:59 IST

Raigad News : नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात ५३ हजारांहून अधिक व्यक्तींना बाधा झाली होती. सध्या ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग: कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या बी प्लॅन असलेल्या होम आयसोलेशनला यश आले असून, नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात ५३ हजारांहून अधिक व्यक्तींना बाधा झाली होती. सध्या ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात सर्वात जास्त ८८५ रुग्ण आढळले आहेत. तळा तालुक्यात ० तर सुधागड, श्रीवर्धन तालुक्यात १ रुग्णाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात बाधित रुग्णांची आजची संख्या १ हजार ६०५ आहे. यातील ९४१ रुग्ण हे घरीच उपचार करून घेत आहेत. त्यामुळे रुग्णांवर आलेले मानसिक दडपण कमी झाले आहे, तसेच नागरिकांमध्ये आता सजगता आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आले आहे. 

गृह विलगीकरण (वयानुसार) जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये  ९४१रुग्ण आहेत. सर्वात जास्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ८८५, सर्वात कमी तळा तालुक्यात शुन्य रुग्ण आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आसली तरी काळजी घेण्याची गरज आहे. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर काही रुग्णांनी घरी राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. ९५ टक्के रुग्ण बरे झाले असून, लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.            - निधी चौधरी, जिल्हाधिकारी 

गृह विलगीकरणासाठी काय अटी?गृह विलगीकरणासाठी राहिलेल्या रुग्णाने स्वत: एकाच रूममध्ये राहावे, घरातील इतर व्यक्तींशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णाला दिलेले औषधोपचार त्याने वेळेवर घ्यावे, तसेच पोषक आहार करावा. दिवसातून एकदा ऑक्सिजन लेव्हल तपासावी. थोडेसेही अस्वस्थ वाटत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

मनोबल वाढविण्याचा केला जातो प्रयत्न 

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी रोज आरोग्य विभागामार्फत रुग्णास फोन केला जातो. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल व त्याच्या तापमानाची माहिती घेतली जाते.  

तसेच रुग्णाला आरोग्यविषयक सल्ला देऊन त्याचे मनोबळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व कारणांमुळे रुग्णांना देखिल दिलासा मिळत आसल्याचे दिसुन येत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड