शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

coronavirus: म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात नव्याने १७ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:22 IST

ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्याप प्राथमिक आरोग्य केंद्रा नंतर तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवलातून स्पष्ट झाले आहे.

म्हसळा - शहरासहित तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने थेट सरकारी कार्यालयात आपली उपस्थिती नोंदवली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्याप प्राथमिक आरोग्य केंद्रा नंतर तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवलातून स्पष्ट झाले आहे. खबरदारी घेत तहसील कार्यालय व नगरपंचायत पुढील व स्टेट बँक दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.मंगळवारी म्हसळा शहरासहित तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहे. एका दिवसात सापडणाºया कोरोना रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक असून तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एका मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना, गोंडघर येथील आरोग्य सेवेत कार्यरत असणाºया मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार जणांना, गौळवाडी परिसरातील एका तरुणाला, शहरातील सोनार आळी येथील एका महिलेला, शहरातील एक बेकरी मालकाला, शहरातील एक भाजी विक्रे त्याला, शहरातील एक हार विक्रे त्याला कोरोनाची लागण झाली आहे.बँक व्यवस्थापकाला बाधा तहसील कार्यालयातील एका कर्मचाºयाला, नगरपंचायतीमधील एका कर्मचाºयाला, म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाºयाच्या पत्नीला व स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाल्याचे प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले आहे.रोह्यात बाधितांचा आकडा २०२ वररोहा : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कायम असून, सोमवारी सात तर मंगळवार ७ जुलै रोजी पुन्हा तालुक्यात १७ जणांचे नमुने कोरोनाचे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या आता २०२ वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसांत पुन्हा तालुक्यात कोरोनाचे २४ नवे कोरोना बाधित वाढले असून, त्यामध्ये १२ महिलांचा समावेश आहे. रोहा शहरातील दत्तमहिमा अपार्टमेंट ५, अंधार आळी १, रूप निवास खंडोबा मंदिराजवळ २, पारिजात रायकर पार्क ४, धावीर कृपा २, बालकृष्ण कॉम्प्लेक्स १ असे एकूण १५ रुग्ण बाधित झाले आहेत. वरसे ५, नागोठणे २, आरे बुद्रुक १ तर वाघेश्वरनगर रोठ येथील १ असे २४ रुग्ण आहेत. रोहा तालुक्यातील २०२ बाधितांपैकी ९० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड