शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची सेवा ३० तास ठप्प!

By admin | Updated: April 27, 2017 00:03 IST

डिजिटल इंडियाच्या रेट्यामध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेसह लँडलाइन फोन सेवाच तब्बल ३० तास ठप्प पडली होती.

अलिबाग : डिजिटल इंडियाच्या रेट्यामध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेसह लँडलाइन फोन सेवाच तब्बल ३० तास ठप्प पडली होती. बीएसएनएलच्या खंडित सेवेचा फटका अलिबाग बीएसएनएल केंद्रांतर्गत येणाऱ्या एक हजार १७५ इंटरनेट ग्राहक आणि तीन हजार लँडलाइन ग्राहकांना बसला. काहीच दिवसांपूर्वी ग्राहकांना बंद सेवेचा फटका बसला होता.संपूर्ण टेलिफोन केंद्र बंद पडले असताना येथे त्याची दुरु स्ती करु न ते पूर्ववत सुरु करण्याकरिता स्थानिक अभियंते अपयशी ठरल्याने आता पनवेल येथून अभियंते येणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा तसेच लॅन्डलाइन सेवा बंद पडल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा रु ग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह यांचा जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांशी संपर्कतुटला होता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आॅनलाइन सेवाच बंद पडल्याने जनसामान्यांची चांगलीच दमछाक झाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांना कामे न झाल्याने रिकाम्या हातीच परतावे लागले. इंटरनेट सेवाच ठप्प असल्याने करणार काय असे उत्तर सरकारी कार्यालयातून मिळताच. कामानिमित्त आलेल्यांनी बीएसएनएलच्या नावाने खडे फोडले.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान बीएसएनएलच्या केबलला ड्रॅप लागल्याने अलिबाग सर्कलमधील बीएसएनएल यंत्रणा ठप्प झाली. त्यामध्ये बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचाही समावेश आहे. अलिबाग सर्कलमधील मुरु ड आणि म्हसळ्याच्या बीएसएनएल सेवाही यामुळे पुन्हा बाधित झाली. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच बँकांचे व्यवहार अडचणीत आले होते. नेटवर्कनसल्यामुळे कोअर बँकिंग, एटीएम सेवाही विस्कळीत झाली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इंटरनेट आणि फोन सेवा पूर्ववत सुरु झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)