कोल्हारे गावात विकासकामांचे भूमिपूजन

By Admin | Updated: December 22, 2016 06:27 IST2016-12-22T06:23:49+5:302016-12-22T06:27:06+5:30

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून सुमारे नऊ लाख रु पयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी

Bhumi Pujan of development work in Kolhara village | कोल्हारे गावात विकासकामांचे भूमिपूजन

कोल्हारे गावात विकासकामांचे भूमिपूजन

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून सुमारे नऊ लाख रु पयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामनिधीतून सुनिता चव्हाण यांच्या घरापासून ते पेशवाई रोडपर्यंत सिमेंट काँक्र ीट रस्ता व गटार करणे यासाठी २ लाख ९९ हजार, भोलेनाथ स्टोअर्स ते प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ रस्ता पेवर ब्लॉक करणे २ लाख ९९ हजार, धामोते येथे सार्वजनिक शौचालये बांधणे २ लाख ९९ हजार अशी अनेक कामे करण्यात येणार आहेत. या भूमिपूजनप्रसंगी सरपंच शेवंतीबाई वळवे, उपसरपंच राजन विरले, ग्रामपंचायत सदस्य विलास हजारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विजय हजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Bhumi Pujan of development work in Kolhara village