शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

महाडमध्ये पूरग्रस्तांना नुकसानभरपाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:17 AM

महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली.

दासगाव : महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली. तर भातशेतीचे पंचनामे अद्याप सुरू असून, त्याबाबतचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आल्यानंतर भरपाईचे वाटप होणार आहे.महाड तालुक्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. यामुळे सखल भागात कायम पाणी साचून राहिले. खाडीपट्टा आणि रायगड विभागातील भात शेतात पुराचे पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. यात भातशेती, घरे आणि पाळीव जनावरांचा समावेश आहे. पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे केले असून त्यानुसार महाड तालुक्यातील ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत दोन लाख २७ हजार ५५० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ही नुकसानभरपाई संबंधित नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे पुरात मरण पावली आहेत. या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात आली असून, संपूर्ण तालुक्यात सहा लाख २२ हजार रुपयांची मदत आतापर्यंत वाटप झाली आहे. विन्हेरे गावातील मंगेश रामभाऊ विसापूरकर या मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना तत्काळ मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती महाड तालुक्यातील असून खेडमध्ये पुरात मयत झाल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले.महाड तालुक्यात शेतीचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. हे पंचनामे कृषी विभाग, महसूल आणि पंचायत समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने सुरू आहेत. याबाबतही लवकरच मदत प्राप्त होईल, असेही तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी सांगितले. महाड तालुक्यातील बहुतांश भागात सलग सात ते आठ दिवस पुराचे पाणी शेतात साचून राहिले. अतिवृष्टीत भाताची रोपे वाहून जाणे, शेतात माती येऊन नुकसान झाले आहे. तालुक्यात तसेच शहरात अनेक घरात तसेच दुकानांत पुराचे पाणी शिरले. मात्र, याबाबत शासन निर्णयात बसत नसल्याने मदतीस विलंब होत आहे.भेलोशी शिक्षण मंडळाची मदतसांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी महाडमधील भेलोशी पंचक्रोशी शिक्षण मंडळाकडून मदतीचा २५ हजारांचा धनादेश महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगड