ड्रंक अ‍ँण्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई

By Admin | Updated: April 20, 2017 03:48 IST2017-04-20T03:48:42+5:302017-04-20T03:48:42+5:30

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.

Action under drunk and drive | ड्रंक अ‍ँण्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई

ड्रंक अ‍ँण्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या तरु ण पिढीचे आकर्षण ठरणारी विविध कंपन्यांनी काढलेली मॉडलेट वाहन खरेदी करण्याकडे येथील तरुण पिढीचा कल दिसून येत आहे. परिसरातील रस्त्याअंतर्गत असलेली मद्याची दुकाने बंद असतानाही वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवित असल्याने त्यांच्यावर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरु वात केली आहे.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रायसिंग वसावे, पोलीस हवालदार संदीप पाटील, अजय आव्हाड यांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत धडक कारवाईची मोहीम सुरू केल्याने मद्य पिवून वाहन चालविणाऱ्यांचे व तळीरामांचे धाबे दणाणले आहेत. रसायनीत वाहतूक पोलिसांनी विनापरवाना व धूमस्टाईलने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेदरकार वाहन चालविणाऱ्यांना जरब बसणार आहे. रसायनी वाहतूक शाखेच्या प्रयत्नाने अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करून त्यांना ब्रेक लावण्याचा वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत. दोनपेक्षा जास्त व्यक्ती दुचाकीवर बसणे, नंबर प्लेट नसणे, परवानगीशिवाय इतर साहित्याची वाहतूक करणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही कठोर कारवाई सुरू असून वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, नो पार्किंग क्षेत्रात वाहने थांबवू नयेत, रात्रीच्या वेळी वाहन थांबविताना पार्किंग लाइट लावावे, धोकादायक ओव्हरटेक करू नये, अवैध वाहतूक केल्यास व अतिवेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा रसायनीतील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला.

Web Title: Action under drunk and drive