सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

By Admin | Updated: September 1, 2015 04:35 IST2015-09-01T04:35:42+5:302015-09-01T04:35:42+5:30

महाड तालुक्यात फासेपारधीच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांचे मेसेजेस सध्या व्हॉटसअ‍ॅपवर महाडमध्ये सर्वत्र पसरवले जात असून अशा प्रकारचे अफवांचे मेसेजेस

Action on rumors spread over social media | सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

महाड : महाड तालुक्यात फासेपारधीच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांचे मेसेजेस सध्या व्हॉटसअ‍ॅपवर महाडमध्ये सर्वत्र पसरवले जात असून अशा प्रकारचे अफवांचे मेसेजेस मोबाइलवर टाकणाऱ्यांवर तसेच आलेले मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी दिला.
गेल्या पाच - सहा दिवसांपासून महाडमध्ये मोबाइलवर तालुक्यात तीनशे फासे पारधी उतरलेले असून त्यापैकी पाच जणांना शहर पोलीसांनी पकडले असल्याचे मेसेजेस सर्वत्र फिरत असून या मेसेजेस मुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. तालुक्यातील बिरवाडी, सणसवाडी, गोठवली, खोताचीवाडी, पदाचा कोंड या आसपासच्या खेडेगावांमध्ये हे फासपारधी येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कुठलीही फासेपारध्यांची टोळी महाड परिसरात आली नसल्याचे स्पष्ट केले. व्हॉटसअ‍ॅपवर फिरणारे मेसेजेस हे निव्वळ अफवा असल्याचेही सोनावणे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Action on rumors spread over social media