शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 06:29 IST

महिनाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई

नेरळ : शहरात तसेच परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली असून बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचा डोस दिला जात आहे. महिनाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईकेली असून त्यांच्याकडून सुमारे ९० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे उल्लंघन करणाºया चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी चालकांवर बेधडक करवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. मात्र काही महिन्यांपासून नेरळ शहर व परिसरात ही कारवाई थंडावली होती. पुन्हा या कारवाईला सुरुवात झाली आहे. नाकानाक्यावर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, वाहन वेगाने चालवणे, गणवेश न घालणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, ट्रीपल सीट, दारू पिवून गाडी चालवणे अशा प्रकारे वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईतून दंडही वसूल केला जात आहे. परंतु वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, वाहनांवरून फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहन चालकांवर कारवाई होता दिसत नाही. तसेच नेरळ शहरात अनेक रिक्षा स्टँड असून सुमारे ५००हून अधिक रिक्षाचालक आहेत, परंतु मोजके रिक्षाचालक सोडले तर अनेक रिक्षाचालक गणवेश घालत नसल्याचे चित्र आहे.तसेच नेरळ शहरात ही कारवाई सुरू असली तरी नेरळ बाजारपेठ तसेच नेरळ बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने लावली जात असल्याने प्रवासी व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नेरळ बाजारपेठेत आणि नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहनचालक कशाही रिक्षा लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे आणि त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.गेल्या महिनाभरात सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक शिओळे, सुभाष पाटील, आशिष कराळ यांनी नेरळ शहरात सुमारे ३०० वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड