शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये डेंग्यूचे २० संशयित; डासांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:46 IST

ताप, खोकल्याच्या रुग्णांतही वाढ

उरण : उरण परिसरात ताप, सर्दी, थंडी, खोकल्याबरोबरच डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे विविध विकारांच्या रुग्णात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उरणमध्ये सरकारी, खासगी व ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचे जवळपास २० संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.उरण शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, थंडी, खोकल्याबरोबरच डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात उघडे नाले, गटारे आणि सांडपाणी यांच्यावर आरोग्य विभागाकडून नियमित औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे विविध विकारांच्या रुग्णात वाढ होत आहे. सध्या उरण परिसरात २५ पेक्षाही अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. काही डेंग्यूचे संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.ग्रामीण विभाग आतापर्यंत डेंग्यूचे १६ रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली. उरण परिसरात ताप, सर्दी, थंडी, खोकला आदी विविध विकारांच्या रुग्णातही वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. शहर आणि ग्रामीण भागात डासांची पैदास होणार नाही याची आरोग्य विभागाकडून दक्षताही घेतली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाकडून संशयित ठिकाणी जाऊन डास प्रतिबंधक फवारणी आणि संशयित नागरिकांची आरोग्याची तपासणी केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली.उरण शहरात डेंग्यूचे तीन-चारच संशयित आढळले आहेत. मात्र नगरपरिषदेच्या हद्दीत डेंग्यूची साथ नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्याप मिळालेल्या आकडेवारीवरून तसे काही दिसून आलेले नाही.- मनोज भद्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.

टॅग्स :dengueडेंग्यू