शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधून २,५०० दुर्गामूर्तींचे प्रयाण सुरू

By admin | Updated: October 10, 2015 23:49 IST

नवरात्री उत्सवाच्या नवरंगांची उधळण करण्याची वेळ समीप येऊन ठेपली असताना पेणच्या कार्यशाळेत नवदुर्गांच्या मूर्तीवर अखेरचा कुंचला फिरविण्यात मूर्तिकार दंग आहेत. सार्वजनिक

पेण : नवरात्री उत्सवाच्या नवरंगांची उधळण करण्याची वेळ समीप येऊन ठेपली असताना पेणच्या कार्यशाळेत नवदुर्गांच्या मूर्तीवर अखेरचा कुंचला फिरविण्यात मूर्तिकार दंग आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गामातेच्या मूर्तीवर साजशृंगार चढवून कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत मूर्तीचे प्रयाण होऊ लागले आहे. पेण शहर व हमरापूर जोहे कलाग्राममधून तब्बल २,००० ते २,५०० मूर्ती रवानादेखील झाल्याचे कार्यशाळांमधील सूत्रांनी माहिती देताना सांगितले. याशिवाय गावोगावाची आद्यशक्ती व ग्रामदेवतेच्या मंदिराची रंगरंगोटी, सजावट होऊन नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी झाली आहे. एकंदर मंगळवारपासूनचे १० दिवसांचा उत्सवाचा आनंद उपभोगण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे चित्र आहे.नवरात्रोत्सवाचा आद्यशक्तीचा नऊ दिवस चालणारा जागर व त्यातून होणारा उत्सवाचा माहोल उत्साही असतो. भारतीय संस्कृतीत घटस्थापनेद्वारे स्त्रीशक्तीची उपासना व जागर करण्याची प्राचीन कालखंडापासूनची चालत आलेली परंपरा आजतागायत सुरू आहे. उत्तरोत्तर या उत्सवाचा थाटमाट वाढत आहे. मंदिरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची जागा आता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडपात येऊन ठेवलीय. ह्यात आदिवासी समाज असो की प्रगत हायप्रोफाइल सोसायटीमधील समाज. गरबा, दांडिया यावर थिरकरणाऱ्या तरुणाईच्या बेधुंद पावलांनी हा इव्हेंट लोकप्रिय झाला आहे. आकर्षक फॅन्सी ड्रेस, बेधुंद संगीत व रात्रभर आद्यशक्तीचा जागर यामधून जगतजननीचा चालणारा हा उत्सव आता महोत्सव झालाय.महाराष्ट्रात आद्यशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. सोलापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, नांदेड माहुलगडावरील रेणुकामाता या तीन शक्तिपीठांबरोबर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता अर्धपीठ अशी विभागणी आहे. याबरोबर आद्यशक्ती तेथील ग्रामसंस्कृतीच्या नावाने रूढ आहेत. याशिवाय काळभैरव, बहिरीदेव गावच्या वेशीवरचे देव, कुळदैवत मल्हारी मार्तंड या सर्वांचा नवरात्रीत नऊ दिवसांचा जागर सर्वभाविक आनंदाने साजरा करतात. (वार्ताहर)