शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

महासंघाचे २१ पैकी १४ उमेदवार बिनविरोध

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे गटाच्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी अपात्र ठरवले होते. त्यावर तुळपुळे गटाने जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडक यांच्याकडे अपिल केले असता, त्यांनीही अर्ज अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. जिल्हा उप निबंधकांच्या निर्णयास तुळपुळे गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, उच्च न्यायालयानही मूळ अर्ज अपात्रतेच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परिणामी, २१ जागांकरिता उभ्या असलेल्या प्रा. डॉ. उदय जोशी गटाचे १३ व अन्य एक अशा १४ पात्र उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.महासंघाच्या उर्वरित ७ जागांपैकी ३ जागा रिक्त राहिल्या असून, अन्य चार जागांकरिता ८ मे २०१७ रोजी मतदान होणार असून त्यानंतर औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी हे करतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ एप्रिल २०१७ पर्यंत होती. उमेदवारी घेण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ६ मतदार संघातील १४ जागांकरिता १४ उमेदवारच पात्र असल्यामुळे या सर्व १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.बिनविरोध निवडून आलेल्या १४ उमेदवारांपैकी १३ उमेदवार प्रा. डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे असून, या १३ उमेदवारांमध्ये अ‍ॅड. जे. टी. पाटील (अलिबाग), अ‍ॅड. सागर पाटील (अलिबाग), अ‍ॅड. संतोष पवार (अलिबाग), अ‍ॅड. के. एस. पाटील (पनवेल), हेमंत पाटील (उरण), प्रकाश चांदिवडे (कळंबोली), दिलीप पटेल (रेवदंडा), चंद्रकांत घोसाळकर (पाली), दिलीप जोशी (मुरुड), जगदीश कवळे (अलिबाग), योगेश मगर (वेश्वी-अलिबाग), श्यामकांत भोकरे (बोर्लीपंचतन-श्रीवर्धन) व निजामुद्दीन कागदी (साई-माणगाव) यांचा समावेश आहे. चौदावे गणेश म्हात्रे (चिरनेर-उरण) हेसुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.महासंघाच्या ज्या ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे, त्यामध्ये प्रा. डॉ. उदय जोशी पॅनलचे महिला राखीवकरिता कविता प्रवीण ठाकूर (अलिबाग) व उषा लक्ष्मण चांदगावकर (रोहा) तर अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेकरिता संजय बाबूराव वानखेडे (पिंपळभाट-अलिबाग) व विशेष मागास प्रवर्गातून नरसिंह बाळकृष्ण मानाजी हे निवडणूक लढवित आहेत. (विशेष प्रतिनिधी)