जाचक वस्ती ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:54+5:302021-01-08T04:30:54+5:30

मागील पाच दिवसापूर्वी या ग्रामपंचायतीचे अविनाश मारुती सूर्यवंशी हे बिनविरोध झाले होते. मात्र इतर सदस्यांचे फॉर्म तसेच होते त्यानंतर ...

Zachak Vasti Gram Panchayat unopposed | जाचक वस्ती ग्रामपंचायत बिनविरोध

जाचक वस्ती ग्रामपंचायत बिनविरोध

मागील पाच दिवसापूर्वी या ग्रामपंचायतीचे अविनाश मारुती सूर्यवंशी हे बिनविरोध झाले होते. मात्र इतर सदस्यांचे फॉर्म तसेच होते

त्यानंतर आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व सात सदस्य बिनविरोध करण्यासाठी गावातील सर्वपक्षीय तरुणांनी पुढाकार घेतला व कोणत्याही वादावीना हि ग्रामपंचायत बिनविरोध झाली. यावेळी तरुणांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला . या ग्रामपंचायतीवर तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे ,,सुशील सुरेश पवार, विजया प्रवीण माने, वर्षा विशाल काळे ,अविनाश मारुती सूर्यवंशी, सोनाली महेश निंबाळकर ,सीमा दत्तात्रय पार्लेकर ,प्रकाश मल्हारी नेवसे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध केल्याचे ज्येष्ठ व तरुणांनी सांगितले.

ग्रामपंचायतिचे सदस्य बिनविरोध झाल्यामुळे तरुणांनी जल्लोष केला.

Web Title: Zachak Vasti Gram Panchayat unopposed