रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांना वाहनाने उडवले; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:27 IST2025-09-13T16:25:21+5:302025-09-13T16:27:41+5:30

घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Youth standing on the road were hit by a vehicle; one died, the condition of one is critical, incident in Junnar | रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांना वाहनाने उडवले; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, जुन्नरमधील घटना

रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांना वाहनाने उडवले; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, जुन्नरमधील घटना

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर-ओझर-नारायणगाव रस्त्यावर धोलवड रस्त्याजवळ शनिवारी दुपारी सुमारे १ वाजता भीषण अपघात घडला. रस्त्याच्या साईड पट्टीवर उभे असलेल्या दोन तरुणांना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली. एम.एच १२ एस.एस ६९७७ क्रमांकाची सुपो मॅक्सिमो हे वाहन ओतूरहून नारायणगावकडे जात असताना रमेश डुंबरे यांच्या घरासमोर ही घटना घडली.

या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी किशोर यशवंत कडाळे (रा. वनकुटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरा जखमी उपचाराखाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. वाहनचालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Web Title: Youth standing on the road were hit by a vehicle; one died, the condition of one is critical, incident in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.