तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:33 IST2026-01-24T20:32:47+5:302026-01-24T20:33:22+5:30

तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

Youth missing for 8 days; Body found in lodge near camp creates stir | तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

तरुण ८ दिवसांपासून बेपत्ता; कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

पुणे: गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वाई (जि. सातारा) येथील एका तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. पीयूष ओसवाल (२७, रा. वाई, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पीयूष हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल होती. दरम्यान, बुधवारी दुपारी पुण्यातील कॅम्प परिसरातील मुकेश लॉज येथून बंडगार्डन पोलिसांना फोन आला. लॉजमधील एका खोलीतून तीव्र दुर्गंधी येत असून दरवाजा उघडत नसल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत पीयूष याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्याने एक ते दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पियुष हा मिसिंग असल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात येथे दाखल आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. पीयूषचे वडील सराफा व्यावसायिक आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे लॉज में लापता व्यक्ति मृत पाया गया; आत्महत्या का संदेह।

Web Summary : वाई का एक युवक, जो आठ दिनों से लापता था, पुणे के एक लॉज में मृत पाया गया। पुलिस को फांसी लगाकर आत्महत्या करने का संदेह है। उसकी पहचान पीयूष ओसवाल, 27 वर्ष के रूप में हुई। वाई में गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज की गई थी। जांच जारी है।

Web Title : Missing man found dead in Pune lodge; suicide suspected.

Web Summary : A young man from Wai, missing for eight days, was found dead in a Pune lodge. Police suspect suicide by hanging. He was identified as Piyush Oswal, 27. A missing person report was filed in Wai. Investigation ongoing.