शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने जपले मैत्रीचे बंध

By admin | Updated: August 3, 2015 04:01 IST

‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे युवावर्गाचा खास हक्काचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा दिवस! मैत्री हे असं एकच नातं आहे, जे आपल्याला ठरवण्याचा आणि

पुणे : ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे युवावर्गाचा खास हक्काचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा दिवस! मैत्री हे असं एकच नातं आहे, जे आपल्याला ठरवण्याचा आणि निवडण्याचा हक्क असतो. या नात्याच्या सेलिब्रेशन करण्याचा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’! शहरातील तरुणांची वर्दळ असणारे एफसी रोड, जंगलीमहाराज रोड, एम. जी. रोड गर्दीने फुलले होते. याबरोबरच शहरातील मॉल्समध्ये आणि हॉटेल्समध्येही तरुणांनी गर्दी केली होती. हा डे सेलिब्रेट करण्यासाठी आज अवघी बाजारपेठ नटली होती. जागोजागी, गल्लोगल्ली बाजारपेठांमध्ये फ्रेंडशिप बँड तरुणांना खुणावत होते. मागील दहा-पंधरा वर्षांमध्ये ‘फ्रेंडशिप डे’चं महत्त्व कैक पटींनी वाढलं आहे. या ‘फ्रेंडशिप डे’मध्ये आता सोशल मीडियाही डोकावू लागला आहे. त्यामुळे अगदीच खराखुरा बँड न बांधणारे आपल्या दोस्तांना व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. हा दिवस साजरा करण्याला वयाचं कोणतेही बंधन मानले जात नाही. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आकर्षित करता येईल, अशा प्रकारची व्हरायटी बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात तरुणींकडून ब्रेसलेट स्वरूपातील बँडला तर तरुणांकडून घड्याळ स्वरूपातील बँडला जास्त मागणी आहे. अशा प्रकारचे बँड कायमस्वरूपी वापरता येतात. यामध्ये रंगांचे वैविध्यही खास आहे. याबरोबरच आपल्या जवळच्या मित्राला या स्पेशल दिवशी खूष करण्यासाठी गिफ्टची दुकानेही सजली आहेत. यात आपल्या सख्याला आवडेल अशी किंवा उपयोगी पडेल आणि कायम आठवणीत राहील अशा अनेक वस्तूंची रेलचेल आहे. मैत्री दिनाचा संदेश देणारी विविध प्रकारची आकर्षक स्वरूपातील शुभेच्छा कार्डही बाजारात मोठ्या प्रमाणात होती. इतकेच नाही तर आपल्याला पाहिजे तसे चित्र काढलेले शुभेच्छा कार्ड आपल्यासमोर बनवून देणारे किंवा मित्राचा फोटो देऊन आपल्यासमोर त्याचे स्केच बनविणारे आर्टिस्टही एफसी रोडवर होते. अशाप्रकारे मैत्री दिनाच्या दिवशी आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला विशेष गिफ्ट देत अनेकांनी खूष केले. मैत्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पिवळ्या गुलाबालाही शहरात मोठ्या प्रमाणात मागणी होती.