महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या, दिघीतील लॉजवर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 08:38 PM2021-11-25T20:38:51+5:302021-11-25T20:43:20+5:30

पिंपरी: दिघी येथील एका लॉजमध्ये तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत ...

young man committed suicide by killing a woman at a lodge in dighi | महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या, दिघीतील लॉजवर घडला प्रकार

महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या, दिघीतील लॉजवर घडला प्रकार

Next

पिंपरी: दिघी येथील एका लॉजमध्ये तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. हा प्रकार गुरूवारी सकाळी दहा वाजता
उघडकीस आला. प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर, ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे. दिघी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. प्रकाश अविवाहित असून महिला विवाहित होती. तिला एक मुलगा एक मुलगी आहे.

विवाहितेचा पती एका खुन प्रकरणात चार वर्षापासून कारागृहात आहे. प्रकाशसोबत तिचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी दिघीतील अथर्व लॉजवर जात असत. बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता दोघे लॉजवर आले होते. खोलीत दोघात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यात प्रकाशने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुवारी सकाळी दहा वाजता ते लॉज सोडणार होते. मात्र, त्यांनी लॉज सोडला नाही. त्यामुळे लॉजचे व्यवस्थापक बाळू नवसागर यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना माहिती देत दरवाजा उघडला असता ही घटना उघडकीस आली. महिला बेडवर मृतावस्थेत पडली होती. तर, प्रकाश छताच्या फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही नग्नावस्थेत होते.

Web Title: young man committed suicide by killing a woman at a lodge in dighi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app