पत्ता न सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST2021-02-16T04:11:30+5:302021-02-16T04:11:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सूरज जाधव कोठे राहतो, हे न सांगितल्याने पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता व पालघनने ...

Young man beaten to death for not giving address | पत्ता न सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण

पत्ता न सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सूरज जाधव कोठे राहतो, हे न सांगितल्याने पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयता व पालघनने वार करून जबर जखमी केले. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यातील तिघांना अटक केली आहे.

शादाब आरिफ बागवान (वय २२, रा, नेहरू चौक, शुक्रवार पेठ), शोएब आरिफ बागवान (वय २४, रा. नेहरु चौक, शुक्रवार पेठ) आणि अशोक संतोष सिंग (वय १९, रा. कासेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमन चव्हाण व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी निखिल तोरडमल (वय २२, रा. विष्णुपुरावाडा, बुधवार पेठ) याने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. निखिल तोरडमल हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बुधवार पेठेतील विष्णुपुरा वाड्यासमोर थांबला होता. या वेळी शादाब बागवान व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी याला सूरज जाधव कोठे आहे, असे विचारले. त्यावर तोरडमल याने सूरज कोठे आहे, हे न सांगितल्याने त्यांनी लोखंडी कोयता, पालघनसारख्या शस्त्राने ताेरडमल यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कानावर, दंडावर, तळहातावर वार करुन गंभीर जखमी केले.

Web Title: Young man beaten to death for not giving address