शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मणक्याच्या 'ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस'या आजारापासून तरुण अनभिज्ञ; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 12:11 IST

सावधान!अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस अवघ्या विशी आणि तिशीत गाठू शकते व कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते...

पुणे : शरीराची चुकीची ढब, अतिकष्टांमुळे येणारा थकवा किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे जडलेली पाठदुखी म्हणून बरेचदा दुर्लक्षित राहून जाणारे दुखणे हे प्रत्यक्षात शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनिर्बंध वागण्यामुळे उद्भवणारी एक स्थिती म्हणजे ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) असू शकते, जी अवघ्या विशी आणि तिशीत गाठू शकते व कायमच्या अपंगत्वास कारणीभूत ठरू शकते असा इशारा प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ (Rheumatologist) डॉ. प्रवीण पाटील यांनी दिला आहे. 

ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) हा मणक्याच्या संधीवातातील एक प्रकार आहे. जो १५ ते ४० वयोगटाच्या आतील तरुणांना होतो. डॉ. पाटील यांनी पुण्यातील  या वयोगटातील १०० रुग्णांची पाहणी केली. त्यामध्ये एएसच्या जवळ-जवळ ७० टक्‍के रुग्णांमध्ये आजाराच्या सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये किंवा त्याहून अधिक काळ आजाराचे योग्य निदान होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. संधिवात तज्ञांपर्यंत पोहोचण्यापूर्वी  व योग्य निदान होण्याआधी १६ टक्के रुग्णांना चार पाच डॉक्टरांना दाखवावे लागले तर काही रुग्णांनी दोन ते तीन तज्ज्ञ गाठले असल्याचे दिसून आले.      याविषयी ' लोकमत' शी बोलताना संधीवाततज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील म्हणाले, शंभरातील जवळ-जवळ एक व्यक्ती मणक्याच्या इन्फ्लेमेटरी आर्थ्ररायटीसने ग्रस्त आहे.  या स्थितीमध्ये मणक्याची हाडे एकमेकांशी जोडली जातात व मणका ताठर होतो. यामुळे पाठीला कायमचा पोक येतो. साधारणपणे १४-२० वर्षे वयोगटामध्ये जडणारा व पुरुषांच्या उत्पादक वर्षांची मोठी हानी करणारा हा आजार घरगुती उपचार करून किंवा दुकानात मिळणारी औषधे घेऊन बरा करण्याचा प्रयत्न रुग्णांकडून बरेचदा केला जातो.  या आजारात सायटिका वगैरेसारखे चुकीचे निदान देखील केली जाते. निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे उत्पादकता कमी होणे, कामावरील गैरहजेरी वाढत असल्याचे व त्यामुळे ८ टक्के तरुणांना नोकरीही गमवावी लागल्याचे दिसले.   ......ऍनकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) लक्षणे* तीन महिन्यापेक्षा अधिक काळ कंबरदुखी आणि आखडणे* आराम केल्यावर त्रास होतो रात्री आणि सकाळी वेदना होणे * एका जागी बसल्यावर त्रास होणे

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य