"आमच्या पोरीला नादी लावून आमची बदनामी करता", ११ विच्या विद्यार्थ्याला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:44 IST2022-12-29T09:42:55+5:302022-12-29T09:44:58+5:30

विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.

"You defame us by making Nadi to Amchpori", 11th class student beaten up, extreme step taken | "आमच्या पोरीला नादी लावून आमची बदनामी करता", ११ विच्या विद्यार्थ्याला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

"आमच्या पोरीला नादी लावून आमची बदनामी करता", ११ विच्या विद्यार्थ्याला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

वासुंदे: रोटी ता दौंड येथील अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ बाळू वेताळ या विद्यार्थ्याला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रोटी येथील चार जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. रोटी येथील सोमनाथ बाळू वेताळ ( वय १७) या  विद्यार्थ्यांने १७ डिसेंबर २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

 सोमनाथ यास नाना शितोळे, बंडु शितोळे, दिपाली नाना शितोळे (तिघेही रा.रोटी ता.दौड जि.पुणे) व दादा ( रा.वरवंड , पुर्ण नाव माहित नाही ) आदींनी मुलीच्या कारणावरून हाताने लाथाबुक्याने वेळोवेळी मारहाण केली. तसेच तुम्ही खालच्या जातीचे लोक आमच्या पोरीला नादी लावुन आमची बदनामी करता. असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक देत सोमनाथला आत्महत्येस प्रवृत्त केले‌. अशी फिर्याद त्याची आई आशाबाई वेताळ यांनी मंगळवारी (दिनांक २७) रोजी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातीवाचक शब्द वापरून मानसिक व शारीरिक त्रास देणे याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी ) चा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून  दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: "You defame us by making Nadi to Amchpori", 11th class student beaten up, extreme step taken