यवतला वाइन शॉप फोडले; ४० हजारांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:23 IST2021-02-21T04:23:08+5:302021-02-21T04:23:08+5:30

याबाबतची फिर्याद महादेव मोरे यांनी दिली आहे. मोरे यांनी गुरुवारी वाइन शॉप बंद करून गेल्यानंतर चोरांनी मध्यरात्रीच्या ...

Yavatla wine shop blown up; Goods worth Rs 40,000 | यवतला वाइन शॉप फोडले; ४० हजारांचा माल लंपास

यवतला वाइन शॉप फोडले; ४० हजारांचा माल लंपास

याबाबतची फिर्याद महादेव मोरे यांनी दिली आहे. मोरे यांनी गुरुवारी वाइन शॉप बंद करून गेल्यानंतर चोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दुकानातील २५ हजार रुपये रोख, सुमारे १६ हजार रुपयांची देशी व विदेशी दारूच्या बाटल्या. ५ हजार रुपयांचा डीव्हीआर चोरांनी पळवून नेला.

शुक्रवारी सकाळी आजूबाजूच्या दुकानदारांनी शटर अर्धवट उघडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोरे यांना फोन करून याची माहिती दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर चोरीचा उलगडा झाला.

फोटो ओळ :- यवत येथील न्यू सोनल वाइन्सचे उचकटलेले शटर

Web Title: Yavatla wine shop blown up; Goods worth Rs 40,000