शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

हि-यांची झळाळती दुनिया अवतरणार

By admin | Updated: January 16, 2015 23:51 IST

हि-यांच्या झळाळत्या दुनियेत सैर करत लखलख चंदेरी तेजाची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांच्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे

पुणे : हि-यांच्या झळाळत्या दुनियेत सैर करत लखलख चंदेरी तेजाची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांच्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. डोळे दिपवणाऱ्या झळाळीच्या हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुणेकरांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. १० व ११ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ताज विवांता (ब्ल्यू डायमंड) येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रख्यात डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या हिरेजडित दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन येथे बघायला मिळणार आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन विजय दर्डा या वेळी उपस्थित राहणार आहेत. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे असे हिऱ्यांचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील नावीन्यपूर्ण अशा डिझाइन्स व रचनाकौशल्य मनाचा ठाव घेणारे आहे. अन्यत्र कोठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनामध्ये हिरेजडित कर्णफुले, अंगठ्या, कंठहार, कफलिंग्ज आणि अद्वितीय असे ब्रायडल सेट्स यांचा समावेश असणार आहे. व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन दागिन्यांची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टीवेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नामांकित उद्योजक, शिक्षणसंस्थांचे प्रमुख, व्यावसायिक आदी अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वाखाणले होते. (प्रतिनिधी)