शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करणे अभिमानास्पद : डॉ़. के़.व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:36 PM

पुणे शहरात नुकतेच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्वाचा टप्पा पार केला़...

ठळक मुद्दे१०० ग्रीन कॉरिडॉर यशस्वी केल्याबद्दल सत्कार

पुणे : ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या महत्वाच्या कार्यामध्ये भूमिका बजावणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे़. या सत्कारामुळे आमची जबाबदारी अजून वाढली आहे, असे पुणे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़. पुणे शहरात नुकतेच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्वाचा टप्पा पार केला़. त्यात अनेक संस्था आणि यंंत्रणांचा महत्वाचा वाटा होता़. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याकरीता रुबी हॉल क्लिनिकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते़.  या कार्यक्रमात वाहतूक पोलिस, झेडटीसीसी, पुणे विमानतळ, पत्रकार संघ यांसारख्या महत्त्वाची भूमिका बजावणाºया संस्थांमधील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, वाहतूक शाखेचे माजी उपायुक सारंग आव्हाड, पुणे विमानतळाचे सहकामकाज सरव्यवस्थापक संजय दुलारे, पुणे विमानतळ येथील असिस्टंट कमांडंट सीआयएसएस जी.जी.भार्गव, झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे, वरिष्ठ हदयरोगतज्ञ डॉ. आर. बी. गुलाटी व डॉ. जगदीश हिरेमठ आदी उपस्थित होते. यावेळी अद्वैत केळकर यांच्या हस्ते पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांचा सत्कार करण्यात आला़.ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करत असताना शहर आणि ग्रामीण पोलीस या दोन्ही यंत्रणांसोबत संवाद साधावा लागतो आणि या दोन्ही यंत्रणांचे ग्रीन कॉरिडॉरसाठी संपूर्णपणे समर्पित कार्य कौतुकास्पद आहे, असे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितले़.रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की,पुणे शहरासाठी १०० ग्रीन कॉरिडॉर हा एक महत्त्वाचा टप्पा असून अवयव प्रत्यारोपणाबाबत भारतात पुणे आघाडीच्या शहरांपैकी एक आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की, ग्रीन कॉरिडॉरला लोकांकडून चांगले सहकार्य मिळाले असून खºया  अर्थाने त्यांनी ही संकल्पना स्विकारली आहे.पोलिस आणि एअरपोर्ट यंत्रणा यांची यामध्ये अमूल्य भूमिका असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. याप्रसंगी डॉ.संजय पठारे यांनी सध्याच्या प्रत्यारोपणाच्या स्थितीबाबत सादरीकरण केले, तर डॉ. किशोर पुजारी यांनी आभार मानले.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसHealthआरोग्य