संरक्षक विषयक जाळी न बसवल्याने कामगाराने गमावला जीव; आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:29 IST2025-02-12T15:29:23+5:302025-02-12T15:29:43+5:30

सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Worker lost his life due to failure to install safety net died after falling from the eighth floor | संरक्षक विषयक जाळी न बसवल्याने कामगाराने गमावला जीव; आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

संरक्षक विषयक जाळी न बसवल्याने कामगाराने गमावला जीव; आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील आठव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरवता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरोधात फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राजकुमार प्रजापती (४५, रा. काशीराम काॅलनी, अस्ती, ता. फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत प्रजापती यांचा मुलगा आशिषकुमार (२०) याने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार प्रजापती हे हडपसर-सासवड रस्त्यावरील एका नियोजित गृह प्रकल्पात आठव्या मजल्यावर काम करत होते. त्या वेळी तोल जाऊन पडल्याने प्रजापती यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक विषयक जाळी बसवण्यात आली नसल्याचे उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

Web Title: Worker lost his life due to failure to install safety net died after falling from the eighth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.