गज तुटल्याने पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू; एरंडवणे भागात दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:10 IST2026-03-21T19:10:27+5:302026-03-21T19:10:44+5:30

लॅबोरेटरीत पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बसवण्याचे काम करण्यात येत होते त्यावेळी टाकी बसवण्यासाठी गजाचा आधार देण्यात आला होता

Worker dies after water tank collapses due to broken fence Accident in Erandawane area | गज तुटल्याने पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू; एरंडवणे भागात दुर्घटना

गज तुटल्याने पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू; एरंडवणे भागात दुर्घटना

पुणे : इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसवताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सीमा (वय ४४) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे परिसरातील गुलमोहर अपार्टमेंटच्या आवारात पॅथालॉजी लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरीत पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बसवण्याचे काम २० फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात येत होते. टाकी बसवण्यासाठी गजाचा आधार देण्यात आला होता. तो गज तुटल्याने टाकी बसवणाऱ्या राहुल सतनामी याच्या अंगावर टाकी काेसळली. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

 

Web Title : एरंडवणे में पानी की टंकी गिरने से मजदूर की मौत; लापरवाही का आरोप

Web Summary : पुणे के एरंडवणे में पानी की टंकी लगाते समय गिरने से एक मजदूर की मौत हो गई। लापरवाही का संदेह है; पुलिस ने एक व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया है। मृतक राहुल सतनामी, 21 वर्ष का था।

Web Title : Tank Collapse Kills Worker in Erandwane; Negligence Alleged

Web Summary : A worker died in Erandwane, Pune, after a water tank collapsed during installation. Negligence is suspected; police have filed a case against one individual. The victim was Rahul Satnami, 21.