बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेतले; कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:29 IST2026-02-07T18:28:49+5:302026-02-07T18:29:04+5:30

गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी महिलेला भेटली, याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र महिला पोलीस हवालदाराने तसे केले नाही

Woman police constable suspended for taking money from Bangladeshi girl in Budhwar Peth in pune | बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेतले; कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदार निलंबित

बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेतले; कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदार निलंबित

पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिले. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप महिला पोलीस हवालदारावर ठेवण्यात आला आहे. मनीषा पुकाळे असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. पुकाळे फरासखाना पोलिस ठाण्यातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. 

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे दिले. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना दिले आहेत. देशभरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली.

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत २०२३ मध्ये बांगलादेशी तरुणी दलालामार्फत आली होती. त्यावेळी ती अल्पवयीन होती. वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली होती. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दलाल, कुंटणखाना मालकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी भेटली होती. याबाबतची माहिती पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली नाही. त्यांनी तरुणीकडून पैसे घेतले होते. कायद्यानुसार बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी तक्रारदार बांगलादेशी तरुणीविरोधात कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवली होती.

बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बांगलादेशी तरुणीची चौकशी करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

Web Title : पुणे: बांग्लादेशी महिला से रिश्वत लेने पर महिला कांस्टेबल निलंबित

Web Summary : पुणे में एक महिला कांस्टेबल को बुधवार पेठ में एक अवैध बांग्लादेशी निवासी के खिलाफ कार्रवाई न करने और कथित तौर पर रिश्वत लेने के आरोप में निलंबित कर दिया गया। महिला द्वारा शिकायत दर्ज कराने के बाद उसने वरिष्ठ अधिकारियों को सूचित करने में विफल रही, प्रोटोकॉल का उल्लंघन किया। जांच में दुराचार का पता चला।

Web Title : Pune: Female Constable Suspended for Taking Bribe from Bangladeshi Woman

Web Summary : A female constable in Pune was suspended for not acting against an illegal Bangladeshi resident in Budhwar Peth and allegedly taking a bribe. She failed to inform senior officers, violating protocol after the woman filed a complaint. An investigation revealed the misconduct.