शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा रस्त्यावर टँकरच्या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार पती, मुलगा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:40 IST

डंपर, टँकर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले असून बहुतांश अपघात वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत

पुणे : पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार पती आणि मुलगा जखमी झाला. याप्रकरणी टँकर चालकाविरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रुमी अजित पाल (३१, रा. संतोषनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार पती अजित (३५) आणि मुलगा जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजित पाल, त्यांची पत्नी रुमी आणि मुलगा हे पुणे-सातारा रस्त्यावरून ७ जून रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निघाले होते. धनकवडीतील चव्हाणनगर परिसरातील कमानीजवळ भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात पाल कुटुंबीय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिक, तसेच पोलिसांनी तिघांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच रुमी यांचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे पुढील तपास करीत आहेत.

शहर परिसरात गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पंधरा दिवसात शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. यात तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणी एकता भरत पटेल (२३, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) हिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. येरवडा भागातील शास्त्रीनगर भागात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. डंपर, टँकर, ट्रक अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात झाले आहेत. बहुतांश अपघात अवजड वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे झाले आहेत. अवजड वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातbikeबाईकFamilyपरिवारDeathमृत्यूWomenमहिला