शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मिळाला तिचा हक्क!

By admin | Updated: January 26, 2017 00:06 IST

पळसदेव (ता. इंदापूर) येथील उपशिक्षकाच्या पत्नीला पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा प्रशासन हलले आहे.

लोणी देवकर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील उपशिक्षकाच्या पत्नीला पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा प्रशासन हलले आहे. पळसनाथ शिक्षक प्रसारक मंडळाने तातडीने या महिलेला सेवेत रुजू करून घेतले आहे. या महिलेला शिक्षणसेवकपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.पतीच्या निधनानंतर शिक्षण विभागाकडून आदेश येऊनही अनुकंपा तत्त्वावर सुदर्शना पवार यांना सेवेत घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे पवार यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. सुदर्शना पवार यांचे पती पळसनाथ विद्यालयात उपशिक्षक या पदावर सेवेत होते; परंतु त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे लहान दोन मुलगे, पत्नी व आई-वडील आहेत. पतीच्या निधनानंतर कोणताही आधार नसल्याने पवार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. अनुकंपा तत्त्वावर सुदर्शना पवार यांची नियुक्ती करण्याबाबतची पत्रे पुणे येथील शिक्षणाधिकरी व शिक्षण उपसंचालक यांनी पळसनाथ विद्यालयास देऊनही कामावर रुजू करून घेतले नव्हते. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ हलले आहे.संस्थेने तातडीने सुदर्शना पवार यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच, १५ जून २०१७ पासून अनुकंपा तत्त्वावर कायमस्वरूपी शिक्षणसेवकपदावर नियुक्ती केल्याचे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दिले. नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले.