शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे रुंदीकरण संथगतीने

By admin | Updated: August 10, 2015 02:57 IST

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ देशातील दळणवळणाच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग गेली कित्येक महिन्यांपासून रुंदीकरणाची वाट पाहतोय

कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ देशातील दळणवळणाच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग गेली कित्येक महिन्यांपासून रुंदीकरणाची वाट पाहतोय. महामार्ग रुंदीकरणासाठी दिलेला कालावधी दीड वर्षे उलटून गेलेली असताना महामार्गाचे रुंदीकरण चालूच आहे. काम चालू असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्राकडून वेळोवेळी होताना दिसत असताना जागोजागी पुलांचे काम कासवगतीने होत आहे.स्थानिक नागरिक व प्रवाशांना माहितीच नाही, की पुणे-सातारा महामार्गावर कोणकोणत्या ठिकाणी पूल उभारले जाणार? अतिसंवेदनशील वर्दळीच्या व अपघातग्रस्त ठिकाणी माहामार्गावर प्रथमत: पुलांची उभारणी करून तेथील प्रश्न सोडविण्याची गरज होती. उदा. चेलाडी-नसरापूर, शिवापूर, कामथडी याठिकाणी पुलांची कामे प्रथमत: होणे आवश्यक होती. मात्र, दुसऱ्या ठिकाणी कामे सुरू आहेत. पण, ती कामे पूर्ण कधी होणार? अशी विचारणा नागरिक करताना दिसत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या बाह्यवळणाची कामे जागोजागच्या ठिकाणी ठप्प झाली असताना वाहतूकस्थित असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा रस्त्याचे रुंदीकरण ज्या वेगाने व गतीने होणे आवश्यक आहे ते न होता अनावश्यक कामे चालू आहेत. रुंदीकरणाची कामे गतीने होत नसल्याने वाहतूककोंडी ही नित्याचीच व प्रवाशांना मनस्तापाची बनली आहे. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे.