शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 10:00 PM

बसचे चाक निखळून काही फुट अंतरावर पडलेले दिसते अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो...

पुणे : रात्री दहाची वेळ.. पावसाची रिमझिम सुरू असते...पीएमपी ची एक बस नेहरू रस्त्याने जात असताना अचानक मोठा आवाज होतो. बसमधील प्रवाशांना काही कळण्याच्या आतच बस डाव्या बाजुला झुकते अन् थांबते... प्रवाशांसह चालक-वाहक जीव मुठीत धरून लगबगीने खाली उतरतात... अंधारामुळे बसच्या डाव्या बाजुचे पुढील चाक गटारात अडकले असावे, असे वाटते. पण काही क्षणात हा भ्रम दुर होतो... बसचे चाक निखळून काही फुट अंतरावर पडलेले दिसते अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो... सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) खिळखिळ्या बस शहरातील विविध रस्त्यांवर बंद पडल्याचे दृश्य रोजच दिसते. तर महिन्यातून एखाद्यादिवशी बसला आग लागल्याची बातमी कानावर पडत पडते. कधी छोटे-मोठे अपघातही होतात. यावर कडी करणारा प्रकार मंगळवारी (दि. ३०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यामुळे पीएमपीच्या बसच्या विदारक स्थितीचे वास्तव समोर आले आहे. ह्यपीएमपीह्णच्या कात्रज आगाराची बस (एमएच १२ सीटी १७८१) नेहमीप्रमाणे पॉवर हाऊस चौकातून नेहरू रस्त्याने रामोशी गेटच्या दिशेने निघाली होती. ही बस हौसिंग बोर्ड ते कात्रज (मार्ग क्र.२४) या मार्गावर धावते. यादिवशी चौकातून बस काही अंतरावर पुढे गेल्यानंतर मोठा आवाज होऊन बस डाव्या बाजुला झुकते. बसचा वेग कमी असल्याने बस जागेवर उभी राहते. प्रवाशांसह चालक व वाहक तातडीने बसमधून खाली उतरतात. बसचे डाव्या बाजूचे पुढील चाक अ?ॅक्सल तुटल्याने निखळल्याचे दिसून आले. त्यामुळे निखळलेले चाक काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकीला धडकले होते. रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. यावेळी पाऊसही सुरू होता. त्यामुळे रस्त्यावरही फारशी वर्दळी नव्हती. परिणामी, मोठी दुर्घटना झाली नाही. तसेच बसमधील प्रवाशांनाही कसली दुखापत झाली नाही. पण निखळलेले चाक पाहून सर्वच जण घाबरून गेले होते. प्रत्यक्षदर्शी देवेंद्रकुमार ठक्कर यांनी ह्यलोकमतह्णला याबाबतची माहिती दिली.  ............बसचे चाक अ‍ॅक्सलपासून तुटले होते. या रस्त्यावर नेहमी मोठी गर्दी असते. अपघातावेळी सुदैवाने परिसरात कुणीही नसल्याने मोठा अपघात टळला. एका स्कुटरला चाक धडकल्याने फारसे दुरवर गेले नाही. बसचा वेगही कमी होता. अपघात झाल्यानंतर काही वेळापर्यंत बसचे इंजिन सुरूच होते. पोलिसांनी बस बाजुला करेपर्यंत रस्ताय बंद केल्याने वाहतूककोंडी झाली होती.- देवेंद्रकुमार ठक्कर, ..........प्रत्यक्षदर्शीबसचे चाक निघळल्याने अपघात झाला आहे. यामागचे नेमके कारण शोधण्याचे काम अपघात विभागाकडून सुरू आहे. देखभाल दुरूस्तीतील त्रुटी असू शकतात, असा प्राथमिक अंदाज आहे. ही बस जुनी व पीएमपीच्या मालकीची आहे.- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलAccidentअपघात