शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

'' साहेब '' काही ऐकेना, निबंधात काय लिहावे सुचेना: पुणे पोलिसांची डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:07 AM

वरिष्ठ साहेबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पोलिस निबंध स्पर्धेमुळे उत्साहाऐवजी अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.  

ठळक मुद्देपुणे पोलिस प्रशासनातर्फे पोलिसांसाठी ‘निबंध स्पर्धा’ कर्तव्याप्रती जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्नकर्तव्याप्रती जागरूकता आणि सेवा भावाची जाणीव उत्साह निर्माण होण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन

पुणे :  शहरात भागात घरफोड्या, दरोडे, तोतया, मारहाणीचे गुन्हे वाढले असताना दुस-या बाजुला पोलिस प्रशासन पोलिसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी ‘निबंध’ स्पर्धा घेण्यावर भर देत आहे. पोलिसांंमधील उत्साहाला आणि कार्यक्षमतेला वाव मिळावा यासाठी निराळया पध्दतीचे ‘पोलिसिंग’करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. मात्र या सगळयात वरिष्ठ साहेबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पोलिस निबंध स्पर्धेमुळे उत्साहाऐवजी अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.   पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्याप्रती जागरूकता आणि सेवा भावाची जाणीव उत्साह निर्माण होण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस माझा अभिमान, खाकी माझी शान आणि कर्तव्य दक्षतेतून लोकांच्या हदयात असे विषय निबंध लेखनाकरिता निवडण्यात आले आहेत. याकरिता 30 पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेतील 5 युनिट व 1 भरोसा सेल, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा, वाहतुक विभागातील पाच परिमंडळ, विशेष शाखा 1 व 2 आणि मुख्यालय यातील एकूण 51 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विविध पोलीस स्टेशन त्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक यांना आपल्या कार्यालयात असणा-या कर्मचा-यांकडून निबंध लिहून घेतील. तसेच पोलीस स्टेशन, शाखा आणि मुख्यालय स्तरावरील एखादी व्यक्ती परीक्षक म्हणून काम पाहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.  ही स्पर्धा पोलीस शिपाई ते सहायक पोलीस आयुक्त यांच्याकरिता आयोजिली आहे. त्यांनी पोलीस दलात काम करताना आलेल्या अनुभवावरुन पत्रकात नमुद केलेल्या एका विषयावर 200 ते 250 शब्दांत आपले सविस्तर मनोगत स्वहस्ताक्षरात देण्याची अट  होती. विशेष म्हणजे बक्षीसपात्र निबंधाचे एक पुस्तक तयार केले जाणार आहे. आयुक्त स्तरावरील बक्षीसपात्र मनोगत लिहीणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार पोलीस आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे. 

* निबंधात काय लिहावे हे कळेना ....पोलीस दलातील अनुभव आणि त्यावर आधारित नमुद केल्यापैकी एका विषयावर निबंध लिहिण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला मात्र मेंदुला चालना द्यावी लागत आहे.  दैनंदिन कामातून वेळ काढून दिलेल्या वेळेत निबंधाचे काम पूर्ण करावयाचे आहे. रोज घडणाऱ्या  गुन्हयांचा तपास करायचा सोडून उत्साह आणि जागृतता निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दोघांनाही त्रासदायक ठरला. परंतु साहेबाचे सांगणे, टाळता येईना आणि लिहिण्यात काही सुचेना याची प्रचिती त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसून आली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस