शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election | पुण्यात भाजपा मनसे युतीचे काय, होणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:14 IST

येणाऱ्या महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येणार का?

- राजू इनामदार

पुणे : भोंगा व महाआरतीच्या भूमिकेनंतर राजकारणाच्या पटावर एकदम पुढे आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भारतीय जनता पार्टीबरोबर युती होणार की नाही याची चर्चा आधीच सुरू होती, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूकीसंबधीच्या आदेशानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे.

ही युती झाली तर काय-काय होऊ शकते याचे आडाखे विरोधातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून मांडले जात आहेत. महापालिका निवडणूकांची दोन महिन्यांपूर्वी चर्चा सुरू झाली त्यावेळी मनसे राजकीय दृष्ट्या एकदम पिछाडीवर होती. त्यांचा कोणी विचारही करत नव्हते. खुद्द त्या पक्षाचे स्थानिक नेतेही संभ्रमात होते. मात्र आता राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलल्यानंतर मात्र मनसे चर्चेत आली आहे. त्यातच राज ठाकरे यांना मसनसेकडून हिंदूजननायक म्हणून जाहीरपणे पुढे आणले जात आहे. त्यामुळेच चर्चेला जोर आला आहे.

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करून राज्यात सत्ता मिळवल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या अनुषंगाने शिवसेनेला वारंवार कोंडीत पकडणे सुरू ठेवले. मात्र ते एकटेच पडले होते. त्यांना आता मनसेचे बळ मिळाले आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत मनसे व भाजपा यांची युती होईल का या चर्चेने जोर पकडला आहे. मनसैनिकांकडून याचा निर्णय राज ठाकरे घेतील असे सांगण्यात येते तर भाजपातही वरिष्ठ स्तरावरच यासंबधी निर्णय होईल असे बोलले जाते. मात्र दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा ही युती व्हावी अशीच असल्याचे दिसते आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे नेते युती झाली तरी काही फरक पडत नाही असे सांगत असले तरी त्यांच्यातही या दोन्ही पक्षांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कसे सामोरे जायचे, त्याचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की यामुळे विशेष राजकीय फरक पडेल असे वाटत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा कितीही ताणला तरीही या दोन्ही पक्षांना अखेर व विकासाच्या मुद्द्यावरच यावे लागले असे मत जगताप व जोशी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuncipal Corporationनगर पालिका