काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आम्ही सहभागी होणार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:56 PM2022-10-23T12:56:43+5:302022-10-23T12:56:56+5:30

समाजातील सर्व जातीपातींना एकत्र आणणारी व त्यांच्यात सामंज्यस्य निर्माण करणारी भारत जोडो यात्रा

We will participate in Congress Bharat Jodo Yatra Sharad Pawar | काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आम्ही सहभागी होणार - शरद पवार

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आम्ही सहभागी होणार - शरद पवार

googlenewsNext

बारामती : भारत जोडो यात्रा ही समाजातील सर्व जातीपातींना एकत्र आणणारी व त्यांच्यात सामंज्यस्य निर्माण करणारी यात्रा आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला या यात्रेबाबत निमंत्रण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जेंव्हा ही यात्रा येईल तेंव्हा आम्ही त्याठिकाणी जाणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

बारामती येथे दिवाळी निमित्त संपूर्ण पवार कुटूंब एकत्र आले आहे. यानिमित्त रविवारी (दि. २३) माध्यमांशी पवार यांनी संवाद साधला ते पुढे म्हणाले, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचं आयोजन केलं असून मागील काही दिवसांपासून ते या पदयात्रेत चालत आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत. याबाबत स्वत: शरद पवार यांनी माहिती दिली.

सर्वपक्षीय आघाडीमुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राज्यभर गाजली. यावर भाष्य करताना पवार म्हणाले,  जे लोक राजकारण करत आहेत त्यांचं ते अज्ञान आहे. काही ठिकाणं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रतिनिधी होते. ते माझ्या बैठकांना हजर असत. दिल्लीचे अरूण जेटली होते, अनुराग ठाकूर हे हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केले आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे आहे, बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही,' असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौºयावरही भाष्य केलं. 'कुणी शेतकºयांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी जात असेल तर कशाला शंका घ्यायची? केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी आणि त्यातून जर शेतकºयांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे,' अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Web Title: We will participate in Congress Bharat Jodo Yatra Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.