Pune Water Cut: पुण्याच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:23 IST2025-10-28T11:21:58+5:302025-10-28T11:23:14+5:30
Pune Water Supply News: शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा हाेईल

Pune Water Cut: पुण्याच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
पुणे : पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीची तसेच भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीची गळती दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे या दोन जल केंद्रातून हाेणारा पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ३०) बंद राहणार आहे. या भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा हाेईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. पाणी पुरवठा बंद असलेल्या भागामध्ये पुढील भागांचा समावेश आहे.
लष्कर जलकेंद्र भाग : साेलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, मातवबाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंडवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., सेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची (टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद बेकर हिल टाकी (कोंढवा खुर्द, व वानवडी)
खराडी भाग : संपूर्ण खराडी भाग, भानगाई बस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पडारे नगर सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदन नगर, बोराटे नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, राजधी कॉलनी, मते नगर, माळवाडी, महावीरनगर इ.
भामा आसखेड योजना : शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, मुरलीधर सोसायटी.