शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीचा संदेश

By admin | Updated: July 2, 2017 03:24 IST

कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. भरत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’  या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर  नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. भरत  नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्यशैली  आणि सारंगी, सतार, सरोद, तबला,  पखवाज अशा केवळ पारंपरिक  वाद्यांचा वापर हे या नाटकाचे एक  वैशिष्ट्य होते. इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली. नृत्य व संगीत स्वरूपात विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग सादर केले गेले. ‘प्रवेश’ या संस्थेने पहिल्यांदाच १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागांत नाटकस्वरूपात सादरीकरण केले.
आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून प्रवेश या संस्थेने नाट्यस्वरूपात सादर केला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी ‘मेघदूत’सारख्या नाटकाचे प्रयोग महत्त्वाचे असल्याचे  गिरीश बापट यांनी सांगितले. कोथरूड मतदारसंघात पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबविण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात केली.
प्रथम पटवारी यांनी लेखन केले  असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहेत. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रसिकांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती.

व्याकूळ यक्षाचा संदेश
रामगिरीतील विरहव्याकूळ यक्षाने अलंकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केलेली विनंती, या मार्गातील डोंगरदऱ्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आणि उत्तरमेघात यक्षाने विरहात होरपळणाऱ्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला.