शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वळतीत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: July 14, 2014 05:11 IST

उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू

उरुळी कांचन : उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू असून, पाणीटंचाई भीषण असल्याने गावठाणासह वाड्यावस्त्यांवर टँकरची मागणी ग्रामसेवकांचा संप असल्याने पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्याकडे करणार असण्याची माहिती वळतीच्या उपसरपंच सारिका घोलप व ग्रामपंचायत सदस्य संदीप गायकवाड यांनी दिली. वळती गावची लोकसंख्या दोन हजारांच्या वर असून, वळती परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर ५०० फुटांपर्यंत विंधन विहिरीची पातळी गेली असूनही, पाण्याचा थेंबही नाही. रेल्वे स्टेशन, वरचा मळा, खालचा मळा, नागपुरेवस्तीवर असणाऱ्या पाण्याचे पाणवठे आटले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये डॉ. दादा गुजर यांनी गावाची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी दगडी बांधकामात बांधून दिलेला तलावही ४ वर्षांपासून कोरडा आहे. गावात येणाऱ्या दोन टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येते व तेथून गावाजवळच्या टाकीत सोडण्यात येते. पाणी भरण्यासाठी जवळपास २५० प्लॅस्टिकचे कॅन घेऊन नागरिक पहाटेपासून उभे असतात. पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. पाण्यासाठी वादावादीही होतात. या भीषण परिस्थितीमुळे गावातील प्रवेशद्वाराजवळच कॅनची लाईन (रांगा) पाहूनच गावात येणारे पाहुणे पाण्याची पारख करतात. पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांना कोणी मुलीही देईनात, अशी अवस्था झाली असल्याची खंत संतोष घोलप व संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.