'तू पाच मिनिटे थांब, मी आलोच', मुलाला सांगून रस्ता ओलांडायला गेले अन् टेम्पोची धडक, वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:30 IST2025-04-28T16:29:09+5:302025-04-28T16:30:12+5:30

जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गुलटेकडीतील डायस प्लाॅट चौकातून निघाले होते, तू पाच मिनिटे थांब, मी स्वच्छतागृहात जाऊन येताे, असे वडील मुलाला म्हणाले आणि पुढे जाऊन अनर्थ घडला

Wait for five minutes I m here son told son to cross road and was hit by tempo father dies | 'तू पाच मिनिटे थांब, मी आलोच', मुलाला सांगून रस्ता ओलांडायला गेले अन् टेम्पोची धडक, वडिलांचा मृत्यू

'तू पाच मिनिटे थांब, मी आलोच', मुलाला सांगून रस्ता ओलांडायला गेले अन् टेम्पोची धडक, वडिलांचा मृत्यू

पुणे : रस्त्ता ओलांडताना भरधाव टेम्पाेने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. गुलटेकडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यल्लप्पा अर्जुन पोटे (वय ४२, रा. गंगाराम स्वीट्सशेजारी, डायस प्लाॅट, गुलटेकडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुमीत यलप्पा पोटे (वय १९) याने याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा दोघेही शनिवारी (दि. २६ ) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गुलटेकडीतील डायस प्लाॅट चौकातून निघाले होते. तू पाच मिनिटे थांब, मी स्वच्छतागृहात जाऊन येताे, असे वडील मुलाला म्हणाले. ते शंकरराव डहाणे मार्गावर थांबले होते. यल्लप्पा पोटे रस्ता ओलांडून स्वच्छतागृहात निघाले. त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या पोटे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.

Web Title: Wait for five minutes I m here son told son to cross road and was hit by tempo father dies