Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:21 IST2026-04-10T10:04:45+5:302026-04-10T17:21:34+5:30
Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 10 April 2026: अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतरही अटी-शर्तींवरून सुरू असलेलं वाक्-युद्ध, इस्रायल आणि ...

Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 10 April 2026: अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामानंतरही अटी-शर्तींवरून सुरू असलेलं वाक्-युद्ध, इस्रायल आणि इराणने एकमेकांना दिलेले इशारे, या सगळ्या परिस्थितीचा जागतिक स्तरावर होणारा परिणाम, भारताच्या अर्थकारणावरील परिणाम, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, भोंदू अशोक खरात प्रकरण, आयपीएलचा थरार, या आणि अशा देश-विदेशातील ठळक बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
10 Apr, 26 : 05:09 PM
यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्यानंतर त्यावरील अनेक भाविक नदीच्या पात्रात बुडू लागले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीमध्ये २५ ते ३० भाविक असल्याचं म्हटलं जात आहे. वाचा सविस्तर
10 Apr, 26 : 05:05 PM
ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाची घटना घडली. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हुमायू कबीर याच्या जनता उन्नयन पक्षासोबत असलेली आघाडी तोडली आहे. एमआयएम आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेल्या हुमायू कबीर यांनी बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर ते चर्चेत आले. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला.
10 Apr, 26 : 04:16 PM
मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेल्याचे सांगितले जात आहे.
10 Apr, 26 : 03:39 PM
कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील १० वर्षांचा कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरो याच्यावर दिल्लीत जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास दिल्लीतील टिळक नगर परिसरात ही घटना घडली, जेव्हा अभिनव आपल्या कुटुंबासह कारमधून जात होता. वाचा सविस्तर
10 Apr, 26 : 03:28 PM
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात ८ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ 'सोना पप्पू', जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
10 Apr, 26 : 01:17 PM
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन
व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. मोनालिसा अल्पवयीन असल्याच्या दाव्यांवर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे. ती अल्पवयीन असल्याचं तपासात सिद्ध झालं आहे. मोनालिसाशी लग्न करणाऱ्या फरमान खानच्या अडचणीत यामुळे मोठी वाढ झाली असून त्याच्याविरुद्ध खरगोन जिल्ह्यातील महेश्वर पोलीस ठाण्यात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. वाचा सविस्तर
10 Apr, 26 : 12:43 PM
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.
Yashwant Varma, a judge of the Allahabad High Court, has sent his resignation to the President of India pic.twitter.com/xt3lkmQZPf
— IANS (@ians_india) April 10, 2026
10 Apr, 26 : 11:37 AM
ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
10 Apr, 26 : 11:26 AM
सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. एसीबीने ७ एप्रिल रोजी विजयावाडा आणि विशाखापट्टणम येथे एकाच वेळी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा पर्दाफाश केला. वाचा सविस्तर
10 Apr, 26 : 10:23 AM
एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या - ओमराजे निंबाळकर
"मी दोन टर्मचा खासदार आहे. दोन्ही वेळेस हीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे मी चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याची मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या," असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलं.
10 Apr, 26 : 10:21 AM
बदनामी करु नका, खटला दाखल करु; अरविंद सावंत यांचा इशारा
एकनाथ शिंदेंसोबत बैठक केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला. 'काही झालं तरी मी शिंदेसोबत जाणार नाही. अशा प्रकारे आमचे फोटो छापून ही चुकीची बातमी दिली. मी बदनामीचा खटला दाखल करेन,' असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.
10 Apr, 26 : 10:16 AM
"उद्या त्यामध्ये माझंही नाव टाकतील"; शिंदेंसोबत खासदारांच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी ही बातमी पूर्णपणे निराधार असून या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं. त्या खासदारांच्या यादीत उद्या माझंही नाव टाकतील, असंही संजय राऊत म्हणाले.
10 Apr, 26 : 10:12 AM
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक झाल्याची चर्चा
राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरेंच्या आठ खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यात बुधवारी रात्री गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र ठाकरेंच्या खासदारांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.