धानोरी वॉरियर्स, आदिनाथ क्लबचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST2021-03-21T04:11:15+5:302021-03-21T04:11:15+5:30

पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत धानोरी वॉरियर्स, आदिनाथ क्लब यांनी विजय ...

Victory of Dhanori Warriors, Adinath Club | धानोरी वॉरियर्स, आदिनाथ क्लबचा विजय

धानोरी वॉरियर्स, आदिनाथ क्लबचा विजय

पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत धानोरी वॉरियर्स, आदिनाथ क्लब यांनी विजय मिळवला.

लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या सामन्यात धानोरी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत सात बाद २६३ धावा केल्या. व्हेटेनर्स संघाला ३६.१ षटकांत १९९ धावांवर रोखून धानोरी वॉरियर्सने ६४ धावांनी विजय साकारला. धानोरी वॉरियर्सकडून युवराज परांडे (३२), राहुल साठे (३७), शिवराज शिंदे (३७), सुजल आखाडे (३४) आणि मनोज बराटे (नाबाद ६०) यांनी शानदार फलंदाजी केली. व्हेटेनर्सकडून आनंद माने याने तीन गडी बाद केले. व्हेटेनर्सकडून अमित पाटेकर (४४), विजय जाधव (२६) यांनी झुंज दिली. धानोरीकडून शिवराज शिंदेने चार, शैलेश रणनवरे, युवराज परांडे आणि सूरज पावल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा शिवराज शिंदे सामनावीर ठरला.

बीएमसीसीच्या मैदानावर झालेल्या दुसºया सामन्यात आदिनाथ क्रिकेट क्लबने रॉयल स्पोटर््स क्लबवर १३६ धावांनी विजय मिळवला. आदिनाथ क्लबने ४१ षटकांत नऊ बाद ३०५ धावा केल्या. रॉयल क्लबचा डाव ३४.२ षटकांत १६९ धावांवर संपुष्टात आला. संदेश कोळी (८०), निलेश जोगदंड (४९), श्रेयस जगदाळे (५८) यांनी आदिनाथ क्लबला ३०५ पर्यंत मजल मारून दिली. रॉयल स्पोटर््स क्लबकडून आनंद कावजलगीकर (२७) याने एकाकी लढत दिली. आदिनाथ क्लबकडून श्रेयस जगदाळे, संदेश कोळी यांनी प्रत्येकी तीन तर भारत शिंदे याने दोन गडी बाद केले. संदेश कोळी सामनावीर ठरला.

Web Title: Victory of Dhanori Warriors, Adinath Club