शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिलतर्फे वकिलांची पडताळणी

By admin | Updated: August 22, 2015 02:16 IST

तोतया वकिलांना व बनावटगिरी करणाऱ्यांना आळा बसावा, या हेतूने राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सक्तीने वकिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात बार कौन्सिल

पुणे : तोतया वकिलांना व बनावटगिरी करणाऱ्यांना आळा बसावा, या हेतूने राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सक्तीने वकिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात बार कौन्सिल आॅफ इंडियाचे निर्देश दिले आहेत त्यानुसार ही तपासणी होणार असून, या तपासणीमध्ये प्रॅक्टिस करणारे आणि प्रॅक्टिस न करणाऱ्यांची वेगळी पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांत न्यायालयात वकिलीची कोणतीही पदवी व सनद नसणारे तोतया वकिली करताना आढळले आहेत. शिवाजीनगर न्यायालयात आतापर्यंत १७ बनावट वकील पकडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात तोतया वकिलाला पकडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर वकिलांची पडताळणी करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे. राज्यातील वकिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी त्या, त्या राज्यातील बार कौन्सिलवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि गोवा येथील वकिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवावर आहे.बार कौन्सिलने राज्यातील जिल्हा, तालुका बार असोसिएशनवर त्या भागातील वकिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यासंबंधीची नियमावली आणि फॉर्म पाठविण्यात आले आहेत. त्यात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा पत्ता, नाव आणि मोबाईल नंबर असणार आहे. फॉर्म असणारे, जमीन व्यवहारात, विविध कार्यालयात काम करणाऱ्या वकिलांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. नोकरी करणाऱ्या वकिलाची मात्र प्रॅक्टिस न करणाऱ्या वकिलांमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. वकिलांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र जिल्हा, तालुका बारच्या वतीने बार कौन्सिलला देण्यात येतील. त्या प्रमाणपत्रानुसार वकिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपासून, उच्च न्यायालयातील वकिलांना देण्यात येणार आहे. न्यायाधीश त्यामधील क्रमांक पाहून वकील आहे का, प्रॅक्टिस करतो का, हेदेखील कळणार आहे. कायद्याची माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे न्यायालयांना १ लाख पुस्तके देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)