शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मद्य दुकाने वाचविण्यासाठी सरसावले विक्रेते

By admin | Updated: March 11, 2017 03:12 IST

राज्य व महामार्गालगत असणारी मद्यविक्रीची दुकाने उठवू नयेत, यासाठी मद्यविक्रेत्यांनी नगरसेवकांना हाताशी धरून शहरात राज्य वा राष्ट्रीय महामार्गच नसल्याचा ठराव करून

इंदापूर : राज्य व महामार्गालगत असणारी मद्यविक्रीची दुकाने उठवू नयेत, यासाठी मद्यविक्रेत्यांनी नगरसेवकांना हाताशी धरून शहरात राज्य वा राष्ट्रीय महामार्गच नसल्याचा ठराव करून घेण्याच्या हालचाली चालविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सविस्तर वृत्त असे, की पाच महिन्यांपूर्वी राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर व गावाच्या बाहेर शंभर मीटर अंतरावर असणारे बियरबार, दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. इंदापूर हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचे आहे. महामार्ग विस्तारीकरण, बाह्यवळण रस्त्याचे कामही या भागात झालेले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेले आहे. शहर परिसरात अशी १९ मद्यविक्रीची दुकाने आहेत. तीन दुकाने तर बेकायदेशीररीत्या नगर परिषदेच्या गाळ्यात चालतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका यातील बऱ्याच दुकानांना बसणार आहे. त्यातून धंदा वाचविण्यासाठी अनेक दुकानदारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना साकडे घातले आहे. या शहरातून जाणारा रस्ता हा राज्य रस्ता अथवा महामार्ग नाही, तर नगर परिषदेच्या अधिपत्याखालील रस्ता आहे, अशा आशयाचा ठराव नगर परिषदेत संमत करून घ्यायचा, ही त्या दुकानदारांची मागणी आहे. यासाठी सदर नगरसेवकांना घसघशीत मोबदला देण्याचे आमिषही या दुकानदारांनी दाखवले आहे. तीन नगरसेवक त्यांच्या गळाला लागले आहेत, असे खात्रिलायकरीत्या समजते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये, याकरिता वरील प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. असे काही घडल्यास येत्या तीन एप्रिलपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. दि. ३१ डिसेंबर २०१६ अखेर सार्वजनिक ठिकाणी अडथळा असणारी सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, पुतळे व अतिक्रमणे काढण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची नगर परिषदेने अंमलबजावणी केली नसल्याचे शेख यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.