Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:34 IST2024-07-10T12:34:04+5:302024-07-10T12:34:29+5:30
मुलगा काही कामधंदे करत नसल्याने आजूबाजूचे लोक त्याला हिणवत असे

Pune: शेजारचे हिणवतात! अल्पवयीन मुलाने केली वाहनांची तोडफोड; सात आठ गाड्या फोडल्या
पुणे : एका अल्पवयीन मुलाने शेजारचे हिणवतात म्हणून बुधवारी (दि.१०) मध्यरात्री तीन वाजता गुलटेकडी परिसरात सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. तोड फोड करणाऱ्या अल्पवयीन मुलाला स्वारगेटपोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्वारगेटपोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाच्या वडीलाचे निधन झाले असून तो आई सोबत राहत आहे. तो काही हि काम धंदा करत नसल्याने आजूबाजूचे लोक त्याला हिणवत असे, या तणावातून त्याने मंगळवारी मध्यरात्री मद्यपान करून दगड्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड केली.