शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील हॉस्पिटलमध्ये शिरून केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST

पुणे : कार्डियाक रुग्णवाहिकेतच हॉस्पिटलच्या दारात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही ...

पुणे : कार्डियाक रुग्णवाहिकेतच हॉस्पिटलच्या दारात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ़ सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबारा वाजता व्हिजिटला आले होते़ त्यावेळी एका कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती़ डॉ़ तोतला यांनी त्याला तपासले़ तेव्हा रुग्णाची नाडी लागत नव्हती. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळविले. डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले.

त्यांनी तेथे जमलेल्या १५ ते २० जणांना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपाने मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबीनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकले. दरवाजासमोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त देशमुख, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक ए. के. चाऊस यांनी प्राईम हॉस्पिटलला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेमध्ये स्थानिक नगरसेवक व त्याच्या समर्थकांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये मधील सीसी टीव्ही फुटेज पाहून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.