शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवीचा आज वाढदिवस साजरा झाला असता, पण…; आठवणींनी कुटुंबीय भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:24 IST

- वैष्णवीचा वाढदिवस होता. कुटुंबीयांच्या आठवणींनी आजही डोळ्यांत अश्रू आले. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक

पुणे - राज्याला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. तिच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकारी होते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही तापलेले वातावरण पाहायला मिळाले होते. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती’ असा दावा केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते.दरम्यान, काल वैष्णवीचा वाढदिवस होता. कुटुंबीयांच्या आठवणींनी आजही डोळ्यांत अश्रू आले. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक होऊन म्हणाले, “आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता. ती वाढदिवसाला घरी यायची. माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची. आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत.” हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत.वैष्णवी जिवंत असती तर काल तिचा २३वा वाढदिवस साजरा झाला असता. तिच्या निधनानंतरही कुटुंबीयांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला. वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबीयांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तिच्या आठवणीने आजही कुटुंबीयांच्या मनातील जखम अधिक खोल झाली आहे. तत्पूर्वी, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तब्बल ५८ दिवसांनी बावधन पोलिसांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टात ११ जणांवर तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र १४ जुलैला  दाखल झाले. यात सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे