शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 21:30 IST

हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी

चाकण (जि. पुणे) : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शशांक हगवणे व लता हगवणे यांच्या विरोधातील जेसीबी विक्री गैरव्यवहार प्रकरणाच्या गुन्ह्याच्या तपासात अटक केलेल्या तीन तोतया बँक वसुली एजंटांनी जेसीबी शशांक हगवणे याच्या ताब्यात देण्यासाठी शशांकचा मित्र प्रणय साठे या रिकव्हरी एजंटने मध्यस्थी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रणय तुकाराम साठे (वय २७, रा. कोथरूड, पुणे) याला शुक्रवारी (दि. ६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जेसीबी गैरव्यवहाराच्या मांडवलीसाठी शशांकने त्याचा चालक देवानंद कोळी याच्या मार्फत गुगल पेद्वारे ३० हजार रुपये प्रणय साठे यास दिले असून ती रक्कम प्रणय याने गुगल पेद्वारे अटक आरोपी गणेश पोतले याला दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे.आमचा भाडेतत्त्वावर व्यवहार असल्याचे सांगितले होते, मात्र हा खरेदी व्यवहार आहे हे नोटरीमुळे सिद्ध झाले आहे. प्रणयने मध्यस्थी केल्याने अटकेतील बँक एजंटने जेसीबी जप्त केलाय, नोटरी करारनाम्यातील अटी व शर्तींचा काय उल्लेख केलाय हे पाहावे लागेल. नोटरी करार हस्तगत करायचा आहे, त्यासाठी हगवणे आणि साठे आरोपींना पुन्हा पोलिस कस्टडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

टीटी फॉर्मवर सह्या नाही, फक्त नोटरी झालं म्हणजे हा व्यवहार झाला असे सिद्ध होत नाही. आरोपीवर फक्त पत्नीच्या बाबतचा गुन्हा आहे, इतर साधी कुठे NC दाखल नाही. हगवणे यांचा १८ महिने जेसीबी वापरला आहे. ते भाडे द्यायचे नाही म्हणून हा बनाव केला जात आहे. बँकेचे लोन असल्याने जेसीबी ट्रान्स्फर कसा होणार ? यामध्ये बँकेचा एक रुपयाचा लॉस नाही. फिर्यादीने दिलेल्या ११ लाख ७० हजारांपेक्षा जेसीबीचे भाडे जास्त होते आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

जेसीबी फसवणूक प्रकरणांमध्ये हगवणे माय-लेकासह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि ३ एजंट अशा एकूण सहा जणांची उद्या कोर्टात एकत्रित सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये हगवणे माय-लेकासह प्रणय साठे अशा तिघांना एक दिवसाची पोलिस कस्टडी राजगुरूनगर न्यायालयाने सुनावली आहे. लता हगवणे यांना आली भुरळराजगुरूनगर न्यायालयात जेसीबी फसवणूक प्रकरणात सुनावणी सुरू असताना, लता हगवणे यांना भोवळ आल्याचा प्रकार घडल्याने त्यांना खुर्ची बसायला देण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे