शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:08 IST

लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती.

पुणे : हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात नीलेश चव्हाण याने केलेल्या जामीन अर्जावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे.

वैष्णवी यांच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून त्यांच्या नातेवाइकांना नीलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) याने पिस्तूल दाखवून धमकाविले होते. या गुन्ह्यात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात सोमवारी (ता. १४) पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात हगवणे कुटुंबीयांसह एकूण सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यापैकी लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने त्यास पुढील तारीख दिली असून त्यावर आता २२ जुलैला सुनावणी होणार आहे. तर लता व करिष्माच्या जामीन अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चिती करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे