शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 06:24 IST

आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद

पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी संताप व्यक्त होत असताना आरोपीच्या वकिलाने मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला.

वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. 

पोलिस कोठडीत वाढ  

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलिस कोठडी ३१ मेपर्यंत वाढविली.

चारित्र्यावर संशय  आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेन्डन्सी सुसाइड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

यांना मिळाला जामीन...

फरार दीर, सासरा यांना आश्रय दिला म्हणून अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५) आणि राहुल दशरथ जाधव (४५, दोघेही रा. पुसेगाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेPoliceपोलिस