शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अ‍ॅप वापरताय, सावधान!

By admin | Updated: January 23, 2017 02:55 IST

आॅनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी या सुविधेचा वापर सुरू केला आहे. मात्र ही सुविधा देणाऱ्या व्यक्ती व्यापाऱ्यांची दिशाभूल करत पैशांची अफरातफर

चिंचवड : आॅनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी या सुविधेचा वापर सुरू केला आहे. मात्र ही सुविधा देणाऱ्या व्यक्ती व्यापाऱ्यांची दिशाभूल करत पैशांची अफरातफर करत असल्याची घटना चिंचवडमध्ये नुकतीच घडली आहे. सध्या सर्वाधिक वापरात असलेल्या या आॅनलाइन अ‍ॅपच्या कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र असल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये, यासह अ‍ॅप वापरताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे.चिंचवड मधील इंदिरानगर येथे हनुमान मिनी मार्केट या दुकानदाराचे आॅनलाइन अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये जमा झालेले पैसे बॅँकेच्या खात्यात जमा होत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, पैसे जमा झाले नाहीत. हे पैसे जमा करता यावे म्हणून संबंधित कंपनीच्या व्यक्तीला फोन केला. या व्यक्तीने दुकानात येऊन मोबाइल मागितला. बँकेची संपूर्ण माहिती विचारली. चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करतो असे सांगितले. काही वेळ मोबाईल पाहण्यात घालविल्यानंतर पैसे जमा केल्याचे सांगितले. मात्र, पैसे जमा झाल्याचा मेसेज न आल्याने दुकानदाराला संशय आला. अ‍ॅपमधील पैसे कमी झाले. मात्र, बँक खात्यात जमा का झाले नाहीत याची विचारणा केल्यावर थोड्या वेळेत जमा होतील असे सांगत विषय बदलून अ‍ॅप वापराची इतर माहिती देऊन निघू लागला.मात्र, दुकानदाराने पैसे जमा झाल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. आजूबाजूच्या दुकानदारांना बोलाविले. त्या व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र, त्या व्यक्तीने कामाचे पत्र कंपनीने दिल्याचे दाखविले. परंतु, ओळखपत्र दिले नसल्याचे सांगितले. कंपनीच्या वरिष्ठांना पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले हे तपासायला सांगतो, असे सांगत त्याने फोनही केला. मात्र दुकानदाराने पोलीस तक्रार करणार असल्याचे सांगताच त्या व्यक्तीने काही वेळातच दुसऱ्या खात्यात जमा केलेली रक्कम पुन्हा दुकानदाराच्या खात्यात जमा केली. याबाबत दुकानदाराने वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, या व्यक्तीला आम्ही कामावरून दोन दिवसांपूर्वीच काढले असल्याचे सांगत हात वर केले. पोलिसांचा धाक दाखविल्यानंतर तुमचे पैसे मी माझ्याच खात्यावर जमा केल्याची कबुली त्या व्यक्तीने दिली. कोणतेही ओळखपत्र नसताना आॅनलाइन अ‍ॅपच्या नावाखाली शेकडो तरुण काम करत असल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)